विराटच्या खराब खेळीसाठी नेटीझन्सनी अनुष्काला जबाबदार धरत ती विराटसाठी लकी नसल्याचे म्हटले आहे. यामुळे पुन्हा एकदा अनुष्काला ट्विटर युजर्सच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. लग्नानंतर काही दिवसातच विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळायला आला आहे. तेथे अनुष्का देखील त्याच्या सोबत आली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्यात काल विराट कोहली अवघ्या पाच धावा करून बाद झाला. त्याच्या व संघाच्या खराब खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या इंनिंगमध्ये १४० धावांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे आता विराटच्या खराब खेळीसाठी नेटीझन्सनी अनुष्काला जबाबदार धरले आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews